14 April, 2018




भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुतळ्यास मानवंदना

                हिंगोली, दि.14: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आज त्यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि पोलिस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली. यावेळी पोलिस बँड पथकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली.  तसेच दि. 8 ते 14 एप्रिल कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाची सांगता करण्यात आली.
            यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे,  नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, जात पडताळणी समिती सदस्य सचिव श्रीमती छाया कुलाल, तहसिलदार गजानन शिंदे, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, समाज कल्याणचे सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुट्टे, दलितमित्र संघाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय निलावार, मधुकर मांजरमकर यांची उपस्थिती होती.
*****

No comments:

Post a Comment