13 January, 2023

05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी

निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने यांची नियुक्ती

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : भारत निवडणूक आयोगाच्या दि. 6 जानेवारी, 2023 च्या आदेशानुसार 05- औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक-2023 च्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर मनोहर चन्ने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   

निवडणूक निरीक्षक यांचे निवास औरंगाबाद येथील शासकीय सुभेदारी विश्रामगृह मांजरा या ठिकाणी असणार आहे. त्यांचे संपर्क कार्यालयही शासकीय सुभेदारी विश्रामगृह मांजरा येथे राहणार आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्र. 8956710497 व दूरध्वनी क्रमांक 0240-299801 हे आहेत, असे निवडणूक निर्णय अधिकारी, 05-औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक-2023 यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

***** 

No comments:

Post a Comment