हिंगोली (जिमाका), दि. 08 : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना प्रणालीची अंमलबजावणी परिणामकारकरित्या होण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिका-यांची बुधवार, दि. 10 जुलै, 2024 रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत प्रोटीन टेक्नॉलॉजीते प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेस हिंगोली जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिका-यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे यांनी केले आहे.
***
No comments:
Post a Comment