23 January, 2025

पशुसेवकांची नोंदणी करणे बंधनकारक

हिंगोली (जिमाका), दि. 23 : जिल्ह्यात प्रजननक्षम पशूंसाठी कृत्रिम रेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम रेतन करणारे खासगी पशू सेवक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील सर्व खासगी कृत्रिम रेतन सेवा पुरविणाऱ्या पशू सेवकांनी, गोठीत रेत मात्रा वितरक, रेत बँकांनी पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडे नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. कृत्रिम रेतन (एआय) तंत्रज्ञ म्हणून नोंदणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यक परिषदेने मान्यता दिलेल्या विद्यापीठामधून पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी, भारत सरकारच्या मैत्री (ग्रामीण भारतातील बहुपयोगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञान)चे प्रशिक्षण घेतलेले असावे. तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्याशी समकक्ष असणारी परीक्षा उत्तीर्ण आणि महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्थेमधून कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेली, पशुसंवर्धन क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव आहे किंवा ज्या पशू सखीने कृत्रिम रेतनाचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशी पशू सखी कृत्रिम रेतन (एआय) तंत्रज्ञ म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्र असेल. त्यामुळे खाजगी पशुसेवकांना नोंदणी करावी लागेल, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सखाराम खुणे यांनी सांगितले आहे. ******

No comments:

Post a Comment