03 January, 2025
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला मेळावा उत्साहात साजरा
• जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाले उद्घाटन
• महिला मेळाव्यात विविध मान्यवरांनी केले मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 03 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, समाजसेविका मीराताई कदम, धनंजय कदम, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप, लेखाधिकारी संकेत महाजन, लोकसंचलित साधन केंद्राच्या अध्यक्षा राजमती चांदणे, औंढा लोकसंचलित साधन केंद्राच्या उपाध्यक्षा अनुसया पवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या उद्योग निरीक्षक सुदेशना सवराते, आयसीआयसीआय बँकेच्या शाखा व्यवस्थापक सोनल चोथमल आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते जयाजी पाईकराव व मीराताई कदम यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप यांनी महिलांसाठी बचत गटामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उद्योग, प्रशिक्षण सुविधा, नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीएमआरसीचे व्यवस्थापक सुनिल चव्हाण यांनी केले. तर आभार माविमचे गजानन खिरोडकर यांनी मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील जास्त कर्ज मिळालेल्या गटांचा तसेच ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या सीआरपींचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गिताने झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेखाधिकारी संकेत महाजन, प्रसाद मानेकर, संतोष ठाकूर, रफिक सय्यद, सर्व सीएमआरसी व्यवस्थापक, लेखापाल, सल्लागार, सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास बचतगटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
*****
No comments:
Post a Comment