30 January, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 30 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि हुतात्मा दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आणि आदर व्यक्त करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचारी यांनी मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, नायब तहसीलदार सचिन जोशी, सी. आर. गोळेगावकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. ******

No comments:

Post a Comment