24 January, 2025

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा हिंगोली जिल्हा दौरा

हिंगोली (जिमाका), दि. 24 : राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे दि. 25 व 26 जानेवारी, 2025 रोजी हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. पालकमंत्री श्री. झिरवाळ हे शनिवार, दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता नाशिक येथून हिंगोलीकडे प्रयाण करतील व सायंकाळी 5 वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. 5-15 वाजता शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोटारीने प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे आगमन व जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 च्या आढावा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 6.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथून प्रसाद गार्डन वसमत शहर येथे मोटारीने प्रयाण. सायंकाळी 7 वाजता वसमत येथे आयोजित पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 7.30 वाजता प्रसाद गार्डन वसमत शहर येथून शासकीय विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 9 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. रविवार, दि. 26 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथून पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण करतील. सकाळी 8.55 वाजता पोलीस कवायत मैदान येथे आगमन व प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती राहतील. सकाळी 9.45 वाजता पोलीस कवायत मैदान हिंगोली येथून पलटन हिंगोली येथील रक्तदान शिबिराच्या कार्यक्रम स्थळाकडे त्यांचे मोटारीने प्रयाण. सकाळी 10.15 वाजता पलटन हिंगोली येथे आगमन व रक्तदान शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. 10.45 वाजता फलटन हिंगोली येथून पक्षीय कार्यालय हिंगोलीकडे मोटारीने प्रयाण. 11 वाजता कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती व जनसेवा कार्यालयास भेट, हिंगोली शहरातील पदाधिका-यांसोबत बैठक. दुपारी 12 वाजता आमदार तानाजी मुटकुळे यांच्या यमुना निवास, रामाकृष्ण नगर, बळसोंड निवासस्थानाकडे प्रयाण. 12.30 वाजता श्री. मुटकुळे यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता श्री. तानाजी मुटकुळे यांचे निवासस्थान येथून नाशिककडे प्रयाण. ******

No comments:

Post a Comment