11 February, 2025
कॉपीमुक्त अभियानासाठी दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथकाची नियुक्ती
• भरारी पथकांकडून परीक्षा केंद्रांची तपासणी
हिंगोली (जिमाका), दि. 11 : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) फेब्रुवारी-मार्च 2025 या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी व सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी 24 अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केली आहे.
उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन मंजुषा मुथा, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप मुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. साळुंके, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुने, कृषि विकास अधिकारी अतुल वायसे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगांबर माडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षा कालावधीत आपणास नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर भेटी देऊन परीक्षा केंद्रावरील गैरप्रकाराचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज भरारी पथकातील नियुक्त अधिका-यांनी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देत तपासणी केली.
*******
No comments:
Post a Comment