27 February, 2025

स्वाधार योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांनी त्रुटी पूर्तता करावी

हिंगोली (जिमाका), दि. 27 : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच 12 नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां-मुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून या योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर दिनांक 15 जानेवारी, 2025 पर्यंत स्वीकारण्यात आले होते. या अर्जाची छाननी केली असता अनेक अर्जामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्रुटीचे अर्ज त्रुटी पुर्ततेसाठी विद्यार्थी लॉगीनला रिव्हर्ट/ सेंड बॅक करण्यात आलेले आहेत. विद्यार्थी लॉगीनला दिसत असलेल्या त्रुटी पूर्ण करून विद्यार्थ्यांने आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने तात्काळ परत सबमीट करावे, असे आवाहन यादव गायकवाड, सहायक आयुक्त, समाजकल्याण, हिंगोली यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment