19 February, 2025
हिंगोली जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्या जाहीर
हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सन 2025 या वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार, दि. 25 एप्रिल, 2025 रोजी हजरत चिरागशहा बाबा दर्गा उर्स उत्सव हिंगोली, सोमवार, दि. 1 सप्टेंबर, 2025 रोजी जेष्ठ गौरी पूजन (महालक्ष्मी), सोमवार, दि. 20 ऑक्टोबर, 2025 रोजी नरक चतुदर्शी (दिपावली) सणानिमित्त स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत.
वरील तिन्ही स्थानिक सुट्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषदेतंर्गत कार्यालये, नगर परिषद कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागार महामंडळाची कार्यालये व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना लागू राहतील.
******
No comments:
Post a Comment