11 March, 2025
वसमत शहर पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनाची होणार लिलावाद्वारे विक्री
हिंगोली (जिमाका), दि. 11 : वसमत शहर पोलीस स्टेशन येथे अभिलेखावर नसलेल्या परंतु पोलीस स्टेशन परिसरात पडून असलेल्या बेवारस वाहनाची उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोली यांच्यामार्फत तपासणी केली असता सदरची वाहने खूप वर्षापासून पोलीस स्टेशनला पडून असल्याने त्यांचे नंबर प्लेट चेसीस क्रमांक, इंजिन क्रमांक स्पष्ट दिसत नाही व खोडलेले असल्याने त्याचा मूळ मालक कोण आहे हे कळू शकले नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात 107 दूचाकी वाहने पडून आहेत.
वरील वाहनांबाबत आजपर्यंत कोणीही मालकी हक्क किंवा त्यासंबंधी दस्तावेज सादर करुन मागणी केलेली नाही. त्यामुळे नजीकच्या काळात या बेवारस वाहनाची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक , पोलीस स्टेशन वसमत शहर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
******
No comments:
Post a Comment