25 April, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हिंगोली जिल्हा दौरा
हिंगोली, दि. २५ (जिमाका): उप मुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार (दि.२६) रोजी हिंगोली जिल्हा दौ-यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परभणी येथून मोटारीने सायंकाळी ५ वाजता गुंज येथे आगमन होईल. उपमुख्यमंत्री श्री. पवार हे गुंज येथील मृत महिला शेतमजुरांच्या वारसांना सांत्वनापर भेट देणार आहेत. दि. ४ एप्रिल रोजी येथील शेतकाम करणा-या महिला मजुरांचा नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथील विहिरीत ट्रँक्टर ट्रॉली पडून मृत्यू झाला होता.
त्यानंतर ते वसमत येथील मयुर मंगल कार्यालय येथील सामूहिक विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर वसमत येथील प्रसाद गार्डन मंगल कार्यालय येथून सायंकाळी ७ वाजता विविध विकासकामांचे भूमिपूजन करणार आहेत.
या भूमिपूजनानंतर त्यांची वेळ राखीव असेल. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोईनुसार नांदेडकडे प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment