07 April, 2025

हिंगोली येथे बुधवारी नवीन गुंतवणूकदारांचे संमेलन

हिंगोली (जिमाका), दि. 07 : उद्योग विभाग महाराष्ट्र शासन, उद्योग संचालनालय व येथील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत हिंगोली जिल्ह्यांतर्गत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली व नव उद्योजक यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन गुंतवणूकदारांचे संमेलन दि. 9 एप्रिल, 2025 रोजी शांती हॉटेल, अकोला रोड, हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलनात हिंगोली जिल्ह्यातील नवीन गुंतवणूकदारांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी विभागीय कार्यालयाचे उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, उपविभागीय कार्यालयातील अधिक्षकीय उद्योग अधिकारी अमोल इंगळे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. मैत्री पोर्टलचे नोडल अधिकारी शासनाकडून उद्योजकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या परवान्याबाबत अंमलात आलेल्या नवीन कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जालना येथील निर्यात सल्लागार यांनी हिंगोली जिल्ह्यातील नवीन उद्योजकांना आयात-निर्यातीबाबत विस्तृत मार्गदर्शन करणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांना तसेच नवीन गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांनी मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रवीण मोरे यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment