08 April, 2025

विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे आज हिंगोली दौऱ्यावर

हिंगोली (जिमाका), दि. 08 : विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे उद्या बुधवार दि. 9 एप्रिल रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 10.45 वाजता सेलू येथून हेलिकॉप्टरने हत्ता ता. सेनगाव कडे प्रयाण. 11.15 वाजता हत्ता हेलिपॅड वर आगमन व शासकीय वाहनाने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. 11.25 वाजता हत्ता येथील कार्यक्रम स्थळी आगमन व भूमीपूजन कार्यक्रम तसेच नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता शासकीय वाहनाने हत्ता हेलिपॅड कडे प्रयाण. दुपारी 1.40 वाजता हत्ता हेलिपॅड येथून खाजगी हेलिकॉप्टरने हिंगोली कडे प्रयाण. 1.50 वाजता पोलीस कवायत मैदान हेलिपॅड येथे आगमन व शासकीय वाहनाने बळसोड, हिंगोली कडे प्रयाण. 2 वाजता बळसोंड येथील आ. मुटकुळे यांच्या यमुना निवासस्थान येथे आगमन व राखीव. 3 वाजता बळसोंड हिंगोली येथून वडकुते निवास नाईक नगर हिंगोली कडे प्रयाण. 3.15 वाजता वडकुते निवास येथे आगमन व माजी आमदार रामराव वडकुते यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. 4.30 वाजता मोटारीने पोलीस कवायत मैदान हेलिपॅड हिंगोलीकडे प्रयाण. 4.50 वाजता पोलीस कवायत मैदान हेलिपॅड येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने नांदेड कडे प्रयाण. *******

No comments:

Post a Comment