23 May, 2025

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन

• उमेदवारांनी सूचनांचे काटेकोर पालन करावे हिंगोली (जिमाका), दि. 23 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेचे आयोजन दि. 24 मे ते 5 जून, 2025 पर्यंत प्रविष्ठ उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल, असे दि. 25 एप्रिल, 2025 च्या अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025 परीक्षा घेण्याचे नियोजन दि. 27 ते 30 मे, 2025 आणि दि. 2 ते 5 जून, 2025 या कालावधीत करण्यात आलेले आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच उमेदवारांना देण्यात येतील. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत वेळोवेळी दिलेल्या, प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तसेच परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावरील माहिती पुस्तिकेतील सूचनांचे उमेदवारांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. *****

No comments:

Post a Comment