30 May, 2025

अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर युएचक्यू भरती मेळावा

हिंगोली (जिमाका), दि. 30 : सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्या पाल्यांसाठी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर जवानांची भरती महार रेजिमेंट सेंटर सागर (म.प्र.) या ठिकाणी दि. 23 ते 28 जून, 2025 पर्यंत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती मेळाव्यासाठी रजिस्ट्रेशन करुन घेणे अनिवार्य आहे. महार रेजिमेंट सागर कार्यालयीन भ्रमणध्वनी क्र. 8871180305, 9893837487 वर मेसेजद्वारे आपले नाव नोंदवावे आणि रजिस्ट्रेशन झाल्यावर पूर्ण माहितीसाठी सेंटर सागर यांचा कार्यालयीन भ्रमणध्वनी क्र. 9630141289 वर संपर्क साधावा. होतकरु सैनिकांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी कार्यालयीन भ्रमणध्वनी क्र. 9021208822 वर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा सैनिक कक्ष, हिंगोली यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment