02 May, 2025

डाक विभागाची ज्ञान पोस्ट ही नवीन सेवा सुरु लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 02 : भारतीय डाक विभागातर्फे नवीन या सेवेची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे. या सेवेंतर्गत ज्ञान प्रसाराचे लेखी दस्तावेज, पुस्तके, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक साहित्य (लेखन) माफक दरात डाक सेवेच्या माध्यमातून पाठवणे शक्य होणार आहे. ज्ञान पोस्ट या नवीन मेल उत्पादनाची ओळख : 1) आढावा आणि उद्देश : ज्ञान पोस्ट हे टपाल विभागाच्या मेल सेवांतर्गत एक नवीन उत्पादन असेल. ज्याद्वारे प्रेषक विशिष्ट पुस्तके आणि अध्ययन साहित्य टपाल कार्यालयाद्वारे पाठवू शकेल. 2) वैशिष्ट्ये : ऑनलाईन ट्रॅकिंग सेवेद्वारे वस्तूचे ट्रॅक व ट्रेस करणे, पत्यानुसार विशिष्ट सेवा, पोस्टिंगचा पुरावा (पोस्ट्रींग पावती) प्रेषकास दिला जाईल. वितरणावेळी स्वाक्षरीनिशी मिळण्याचा पुरावा (विनंतीनुसार), या वर्गाअंतर्गत नोंदवलेले पार्सल भूपृष्ट मार्गे पाठवले जातील. ज्ञान पोस्ट अंतर्गत पार्स बुकींगसाठी किमान वजन 300 ग्रॅम आणि कमाल वजन 5 किलो असेल. हे उत्पादन टपाल कार्यालयाच्या काऊंटरवर किरकोळ बुकींगसाठी उपलब्ध असेल. ही ज्ञान पोस्ट या नवीन उत्पादनाची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. 3) प्रेषकासाठी इतर महत्वाच्या सुविधा : पोस्ट केलेल्या टपाल वस्तूचा प्रेषक (जेथे प्रेषक असा उल्लेख आहे तेथे प्रेषक म्हणून विचार करण्यात यावा) पुढील अटींच्या अधीन राहून ती वस्तू पोस्टमधून मागे घेऊ शकतो किंवा तिचा पत्ता बदलू शकतो. ती वस्तू अद्याप प्राप्तकर्त्यांच्या वितरणासाठी इनव्हाईस केलेली नसावी, ती वस्तू देशातील कोणत्याही कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेली नसावी. ती वस्तू अद्याप वितरण कार्यालयात वितरणासाठी इनव्हाईस केलेली नसल्यास प्रेषक अतिरिक्त शुल्क भरुन वस्तू परत मागवू शकतो. ज्ञान पोस्ट या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन मोहम्मद खदीर, डाक अधीक्षक, परभणी विभाग यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment