30 May, 2025

आदिवासी लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 30 : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मंजूर आराखड्यातील योजनानुसार परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी लाभार्थ्यांना वैयक्तीक, सामूहिक योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन येत आहे. या योजनेसाठी इच्छुक लाभार्थ्याकडून शासनाच्या https://www.nbtribal.in या संकेतस्थळावर दि. 1 ते १६ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येतील. या योजनांमध्ये अंशत:, पूर्णत: बदल करण्याचे तसेच वरीलपैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि.हिंगोली यांनी राखून ठेवलेला आहे. प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनी https://www.nbtribal.in या संकेतस्थळावरील योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन सुनिल बारसे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment