03 June, 2025
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी करणार आज मार्गदर्शन
हिंगोली(जिमाका), दि. 03 : जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बुधवार, (दि.४) रोजी शिवाजीराव देशमुख सभागृह येथे सायंकाळी 5 वाजता कार्यशाळा घेण्यात येत आहे. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे मार्गदर्शन करणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत, परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना यश मिळत नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षेत योग्य तंत्राचा वापर करून यश मिळविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना असणारे प्रश्न देखील ते सोडविणार आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त युवकांनी या कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
***
No comments:
Post a Comment