21 December, 2025
मतमोजणी केंद्रास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट; शांततेत प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना
हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सकाळी हिंगोली नगर परिषदेसाठी होत असलेल्या कल्याण मंडप येथील मतमोजणी केंद्रास भेट देऊन मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व शांततेत पार पाडण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या.
या भेटीदरम्यान सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, हिंगोली नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आज हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या नगर परिषदांची मतमोजणी होत असून, सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
******



No comments:
Post a Comment