09 January, 2026

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदय तपासणीसाठी टूडी-इको शिबीर संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 09 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील हृदयरोग संशयित बालकांसाठी आज येथील जिल्हा रुग्णालयात टूडी-इको तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये केआयएमएस हॉस्पिटल, ठाणे येथील तज्ञ हृदयरोग तज्ञ डॉ. श्रीनिवास एल. (कार्डियॉलॉजिस्ट) तसेच डॉ. सोनिया कारापूरकर, विजय खरात व उल्हास पाटील यांच्या तज्ञ पथकाद्वारे तपासण्या करण्यात आल्या. हे शिबीर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस तसेच अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. या शिबीरासाठी उपस्थित विशेषतज्ञांचे स्वागत वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपक मोरे, डॉ. शैलेजा कुप्पास्वामी (नि. वैद्यकीय अधिकारी, बालसंवर्धन), डॉ. नितीन पुरोहित (सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक), डॉ. नितीन अग्रवाल (बालरोग तज्ञ), श्रीमती आशा क्षीरसागर (सहाय्यक मेट्रन) आदी मान्यवरांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी श्रीमती शिंदे (अधिपरिसेविका), श्रीमती कदम (परिसेविका), गाभणे लक्ष्मण (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक), ज्ञानोबा चव्हाण, राजेंद्र खंदारे, ब्रदीनाथ शेळके तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व डीईआयसी कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माते, ए.एन.एम., कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारिकांनी मोलाचे योगदान दिले. या शिबीरासाठी हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यातील एकूण 170 संशयित हृदयरोगी विद्यार्थ्यांची टूडी-इको तपासणी करण्यात आली. त्यापैकी 35 विद्यार्थ्यांना हृदयशस्त्रक्रियेसाठी संदर्भित करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आरबीएसके कार्यक्रमांतर्गत केआयएमएस हॉस्पिटल, ठाणे येथे मोफत करण्यात येणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून, यापूर्वी शस्त्रक्रिया पूर्ण होऊन योग्य उपचार मिळालेल्या पालकांनी आरबीएसके कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी दैनंदिन जीवनात हृदयाच्या आजाराच्या अनुषंगाने वेळोवेळी टूडी-इको तपासणी करून घ्यावी व आजाराचे वेळेत निदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment