08 January, 2026
सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण
हिंगोली (जिमाका), दि. 08: जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान यशस्वीरित्या राबविण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचे आज जिल्हा प्रशिक्षण संघ येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या कालावधीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे.
आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथील प्राचार्य तथा सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान नोडल अधिकारी डॉ. संतोष कडले यांनी या प्रशिक्षण सत्रात सविस्तर मार्गदर्शन केले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक आरोग्य सेविका, गटप्रवर्तक व आशा वर्कर यांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. शैलेजा कुप्पास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे, डॉ तृप्ती पाटील, डॉ. आनंद मेने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. संदिप काळे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी ज्ञानोबा भोसले, मारोतराव पोले, साथरोग तज्ञ डॉ. ईनायतुला खान, सनियंत्रण व मूल्यांकन अधिकारी अमोल कुलकर्णी, जिल्हा सिकलसेल समन्वयक संदीप मूरकर, तालुका सिकलसेल सहाय्यक पंजाब गायकवाड, योगिता पाईकराव, प्रशिक्षण केंद्राचे शोभा पवार अनिता चव्हाण, ज्योती बांगर, मनिषा वडकुते, श्री गायकवाड, शेख मुनाफ, एच एल एस जिल्हा समन्वयक शुभम घुगे उपस्थित होते.
तर सिकल सेल मुक्त हिंगोली जिल्हा घडविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले.
जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी सिकलसेल आजाराची पार्श्वभूमी, तपासणी प्रक्रिया, रुग्ण व्यवस्थापन व अभियानाची अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या अभियाना दरम्यान 15 ते 20 जानेवारी सिकलसेल रुग्ण व सिकलसेल वाहक व्यक्तींची यादी करण्यात येणार आहे. 21 ते 26 जानेवारी झिरो ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्तीची सिकलसेल तपासणी करण्यात येणार आहे. 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आवश्यकतेनुसार लेक्ट्रोफोरेसिस टेस्ट करण्यात येणार आहे. तर 4 ते 7 फेब्रुवारी समुपदेशन करण्यात येणार आहे.
सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाची प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळा, आश्रम शाळा व महाविद्यालय येथे जनजागृती सत्र आयोजित करणे, शाळेतील विद्यार्थ्यामार्फत प्रभात फेरी काढणे, रांगोळी व निबंध स्पर्धाचे आयोजन करणे, महिला मंडळ व बचत गट सभा आयोजित करणे, दवंडी देणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आगामी सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान अधिक परिणामकारकपणे राबविण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक दिशा व माहिती देण्यात आली.
दुपारच्या सत्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांची राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचे आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
*****


No comments:
Post a Comment