हिंगोली, दिनांक १६ (जिमाका): ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत विकसित भारत’ या संकल्पनेतून जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा राबविण्यात येणार आहे. नागरिकांसह सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था आणि विविध शासकीय विभागांनी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले.
स्वच्छता अभियानांतर्गत अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता, बाजारपेठा, बसस्थानके व सार्वजनिक परिसराची साफसफाई, सफाई मित्रांची आरोग्य तपासणी, शून्य कचरा उत्सव, प्रभातफेरी, जनजागृती आणि विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
१ ऑक्टोबरला ‘एक दिवस–एक तास–एक सोबत’ या संकल्पनेतून जिल्हाभर सामूहिक श्रमदान करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) समृद्धी दिवाने यांनी केले.
No comments:
Post a Comment