हिंगोली (जिमाका), दि. 29 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जागतिक माहिती अधिकार दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी, सी. आर. गोळेगावकर, संतोष बोथीकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे जन माहिती अधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आम्रपाली चोरमारे यांनी माहिती अधिकाराने पारदर्शकतेचे नवे पर्व सुरु केले आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीतून पारदर्शकता व उत्तरदायित्व तसेच खुल्या शासन व्यवस्थेसाठीची बांधिलकी व्यक्त करण्यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जात असल्याचे सांगून माहिती अधिकार कायद्याची थोडक्यात माहिती सांगितली .
*****
No comments:
Post a Comment