10 November, 2025

अमृतच्या वतीने मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी

हिंगोली (जिमाका),दि.10: महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेअंतर्गत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्यावतीने राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या श्रेणीतील 18 ते 55 वयोगटातील युवक-युवतींसाठी डीजीसीए मान्यताप्राप्त मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश युवक-युवतींना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे तसेच स्वयंरोजगार व रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देणे हा आहे. प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना ड्रोन ऑपरेशन, शेतीतील ड्रोनचा वापर, सर्वेक्षण, फोटोग्राफी-व्हिडिओग्राफी, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांमध्ये व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे युवकांना अत्याधुनिक कौशल्य प्राप्त होऊन रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या प्रशिक्षणाबाबतची अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी संपर्क क्र.+91 73910 65471 व www.mahaamrut.org.in संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन अमृतच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment