17 November, 2025

'नशामुक्त भारत अभियाना'त सर्वांनी सहभागी व्हावे - जिल्हधिकारी राहुल गुप्ता

* समारोपीय कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन हिंगोली, (जिमाका) दि. १७: केंद्र शासनाच्या निर्णयानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये उद्या मंगळवार, दि. १८ रोजी 'नशामुक्त भारत अभियानांचा समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. दि. १ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान 'नशामुक्त भारत अभियाना'अंतर्गत विविध जागरुकता उपक्रम राबवले गेले. या उपक्रमांमध्ये नशामुक्त भारत प्रतिज्ञा व लेखन, रांगोळी, चित्रकला, घोषवाक्य लेखन, रॅली, नुक्कड नाटक, चर्चासत्रे, कार्यशाळा, योगशाळा आणि नागरिक जागरूकता अभियानांचा समावेश होता. या कार्यक्रमांचा समारोप उद्या‌ मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी अमृतसर, पंजाब येथे होणार आहे. या ठिकाणी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने नशामुक्त भारत अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील सर्व शालेय, महाविद्यालयीन, आश्रमशाळा आणि अनुदानित विना अनुदानित वसतिगृहांमध्ये सकाळी ११ वाजता सामूहिक आणि वैयक्तिक नशामुक्त प्रतिज्ञा घेतली जाईल. यासोबतच सोशल मिडियावर #NMBA हॅशटॅगसह फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून, देशव्यापी नशामुक्त आंदोलनास जास्तीत जास्त पॅम्पलेट्स आणि जाहिरातांचे समर्थन दिले जाईल. याव्यतिरिक्त, जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, सामाजिक संस्था, खाजगी आणि शासकीय वसतिगृहे, तसेच सरकारी कार्यालयांमध्ये 'नशामुक्त भारत अभियाना'च्या ई-प्रतिज्ञेसाठी एकत्रित अहवाल सादर करावा लागणार आहे. हा कार्यक्रम सोशल मीडियावर प्रसारित करणे, विविध माध्यमांद्वारे त्याची जाहिरात करणे आणि त्याचे राष्ट्रीय सूचना विभागामार्फत राष्ट्रीय स्तरावर रिपोर्टिंग करण्यात येणार आहे. नशामुक्त भारत अभियानाने समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित करणे आणि एक मजबूत जागरुकता निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. हा उपक्रम हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याने यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. ***

No comments:

Post a Comment