10 November, 2025

शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2025 या परीक्षेचे रविवार दि. 23 नोव्हेंबर, 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेस प्रविष्ठ उमेदवार, परीक्षार्थ्यांच्या परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. 23 नोव्हेंबर, 2025 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सर्व उमेदवार, परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी. प्रवेशपत्र विहित मुदतीत प्राप्त करुन न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवार, परीक्षार्थ्यांची राहील, याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. *******

No comments:

Post a Comment