28 November, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची पिंपळदरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट

हिंगोली (जिमाका), दि.28 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला भेट देऊन शालेय उपक्रम, मूलभूत सुविधा, विद्यार्थी उपस्थिती तसेच अध्यापनाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील स्वच्छता, डिजिटल शिक्षण साधनांचा वापर, पोषण आहार योजना, शालेय इमारतीची स्थिती व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा यांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पिंपळदरी गावातील नागरिक उपस्थित होते. *****

No comments:

Post a Comment