04 November, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन

हिंगोली (जिमाका), दि. 04 : सन 2025 मध्ये दिवाळीनिमित्त प्रकाशित झालेल्या विविध दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, संतोष ससे, मिलिंद सोनकांबळे , शंभुनाथ दुभळकर, मधुकर सावळे, वाचक व ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये सुमारे 100 पेक्षा अधिक दिवाळी उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे सर्वांकरिता आजपासून 10 नोव्हेंबर, 2025पर्यंत खुले असून सर्वांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा व शासकीय ग्रंथालयाचे वाचक सभासद व्हावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment