‘हिंद दी चादर’ शहीदी समागम वर्षानिमित्त कळमनुरी येथे विविध उपक्रमांचे आयोजन
हिंगोली, दि. 20(जिमाका): नांदेड येथे 24 व 25 जानेवारी रोजी आयोजित विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने कळमनुरी तालुक्यातील गुरुकृपा इंग्लिश स्कूलमध्ये श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून जनजागृती करण्यात आली.
संपूर्ण देशभरात श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त शाळेमध्ये त्यांच्या कार्यावर व धर्म, मानवता आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानावर प्रकाश टाकण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीत गायन स्पर्धा तसेच निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
वक्तृत्व स्पर्धेत श्रेया अनिल कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. निबंध लेखन स्पर्धेत सोहम परमेश्वर वाळे प्रथम आला, चित्रकला स्पर्धेत श्रेयस तुकाराम डिगोळे प्रथम तर गीत गायन स्पर्धेत स्वानंदी कृष्णकांत शेवाळकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. शनिवार, (दि. 17) रोजी साईनगर परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांनी भव्य रॅली काढली. या रॅलीदरम्यान ‘हिंद दी चादर-श्री गुरु तेग बहादूर,’ ‘शीश कटे पर पिछे न हाटे - धर्म के खातिर मर मिटे’ अशा घोषणांनी व श्री गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानावर आधारित गीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. रॅलीमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाली.
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. एस. शेवाळकर सर, एस. के. वाकोडे, ए. जी. गंगावणे, श्रीमती एम. एस. दुडके, श्रीमती एम.एम. राठोड, श्रीमती पी. व्ही. चौधरी, बी. टी. शिंदे, श्रीमती एस. एस. निळकंठ, श्रीमती प्राची चौधरी, श्रीमती एस. एन. देशमुख तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
*****



No comments:
Post a Comment