20 January, 2026

निर्धारीत मानांकन प्राप्त आरोग्य संस्था जानेवारीत एनकॉस प्रमाणित करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांत्याकडून आरोग्य विभागाचा आढावा


हिंगोली: दि. 20, (जिमाका) राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत निर्धारित केलेल्या निर्देशांकाची पूर्तता करून ११ आरोग्य संस्था या महिन्यात एनकॉस प्रमाणित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता  यांनी आज‌ झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत संबंधितांना दिले. 


जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमाचा त्यांनी आढावा घेतला.


यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश मीना, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पांडुरंग फोपसे, डॉ. सुनिल देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस शैलेजा कुपास्वामी, बालरोग तज्ञ डॉ. गोपाल कदम, डॉ. सुवर्णा महाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे यावेळी उपस्थित होते. 


या बैठकीत एन एच एम बरोबरच राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, आकांक्षीत तालुका हिंगोली अंतर्गत मानसिक आरोग्य कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.यावेळी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

*****


No comments:

Post a Comment