19 January, 2026

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत अर्ज सादरीकरणास ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ


हिंगोली, दि.१९ (जिमाका): सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत मंजूर योजनांचा लाभ घेण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 या योजनेंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.nbtribal.in ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीमध्ये अर्ज सादर न करू शकलेल्या लाभार्थ्यांच्या सोयीसाठी दि. २१ ते दि. ३० जानेवारी २०२६ या कालावधीत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रकल्पांतर्गत समाविष्ट असलेल्या परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सर्व आदिवासी लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत, असे जाहीर आवाहन कळमनुरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे यांनी केले आहे.

*****


No comments:

Post a Comment