15 June, 2026

जवाहर नवोदय विद्यालय वसमत येथे इयत्ता 11 वी विज्ञान प्रवेशासाठी सुवर्णसंधी

 


हिंगोली(जिमाका), दि. 15 : जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 11 वी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी गुणानुक्रमे अर्ज मागविण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालय प्रशासनाने केले आहे.

प्रवेशासाठी अर्ज करणारा विद्यार्थी हिंगोली जिल्ह्यातून इयत्ता 10 वी परीक्षेत किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असावा. तसेच विद्यार्थ्याची जन्मतारीख 1 जून 2009 ते 31 जुलै 2011 या कालावधीत असणे आवश्यक आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालय समितीने निर्धारित केलेल्या नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह दि. 25 जून 2026 पर्यंत जवाहर नवोदय विद्यालय, वसमत येथे जमा करावेत.

अर्जाचा नमुना तसेच प्रवेशासंबंधी सविस्तर माहिती www.navodaya.gov.in⁠ तसेच https://navodaya.gov.in⁠/nvs-school/Hingoli/en/home/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या प्रवेश प्रक्रियेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एम. ए. घोनशेटवाड यांनी केले आहे.

********

No comments:

Post a Comment