23 October, 2026

दवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३६ मतदान केंद्रांवर मतदान सुरू जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून वेबकास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेची पाहणी

 



हिंगोली, दि. २३ (जिमाका) : ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील सर्व ३६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.


जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सकाळी वेबकास्टिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेची पाहणी केली. सर्व केंद्रांवर मतदान सुरळीतपणे सुरू असल्याची खात्री करण्यासह मतदान प्रक्रियेवर प्रशासनाकडून सातत्याने निगराणी ठेवण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment