हिंगोली जिल्ह्यात ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप; कोणतीही हानी नाही
हिंगोली, दि. ३ ऑक्टोबर (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात आज सकाळी ९.४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे धक्के हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जाणवले.
प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment