21 January, 2025

राष्ट्रीय मतदार दिनी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करावा

हिंगोली (जिमाका), दि. 21 : राष्ट्रीय मतदार दिन दि. 25 जानेवारी, 2025 रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने 18 वर्ष पूर्ण केलेल्या नवतरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे व त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून या दिवशी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते. तथापि, दि. 25 जानेवारी रोजी शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे दि. 24 जानेवारी, 2025 रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम दि. 24 जानेवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment