20 January, 2025

मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालये, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था, महाविद्यालयामध्ये राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त होण्यासाठी दि. 14 जानेवारी, 2025 पासून मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. हा पंधरवाडा दि. 28 जानेवारी पर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या संवर्धन पंधरवाड्यात मराठी भाषेसंबंधी, वाङमयासंबंधी विविध परिसंवाद, व्याख्याने, कार्यशाळा, शिबिरे, कविसंमेलने, एकांकिका, बालनाट्ये, नाटके, पुस्तक प्रकाशन समारंभ, साहित्य पुरस्कार वितरण, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, कथाकथन, चारोळी, लेखन, कथालेखन, कविता लेखन, हस्ताक्षर, शुध्दलेखन, वक्तृत्व घोषवाक्ये, अभिवाचन, वादविवाद, अंताक्षरी शब्दकोडी, मराठी साहित्यासंबंधी पुस्तकाचे रसग्रहण, समीक्षण, परिच्छेद अनुवाद आदी स्पर्धाचे आयोजन, परिसंवाद कार्यशाळा, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ दिंडी, साहित्यिक कार्यक्रम घेणे यासह भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध स्वरुपाचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. ******

No comments:

Post a Comment