19 February, 2025
अंगणवाडी सेविका- मदतनीसांची पदभरती सुरु • प्रलोभन दाखविण्याचा प्रकार झाल्यास तक्रार करावी
हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (ग्रामीण) अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे.
हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त असलेल्या पदाच्या पद भरती प्रक्रियेसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) हे नियुक्ती प्राधिकारी आहेत. हिंगोली जिल्ह्यातील रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची निवड प्रक्रिया दि. 27 फेब्रुवारी, 2024 व दि. 30 जानेवारी, 2025 च्या शासन निर्णयात नमूद शैक्षणिक अर्हतेनुसार होणार आहे.
संबंधित गावातील पात्र उमेदवारांनी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालय किंवा त्रयस्थ व्यक्तींकडून कोणतेही प्रलोभन दाखविण्याचा प्रकार झाल्यास संबंधित उमेदवारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व जिल्हा परिषद कार्यालय हिंगोली येथे तक्रार करावी, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (बाक) जिल्हा परिषद यांच्याद्वारे करण्यात आले आहे.
***
No comments:
Post a Comment