हिंगोली (जिमाका), दि. 19 : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अभिलेखावर नोंदणी असलेल्या सर्व वाहनधारकांनी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र मॅन्युअल (हस्तलिखित) असलेल्या वाहनाचा अभिलेख संगणकीय प्रणालीवर अद्यावत करुन घेण्यात यावा.
वाहनाचा अभिलेख संगणकीय प्रणालीवर अद्यावत करताना वाहनधारकाने नोंदणी प्रमाणपत्राची छायांकित प्रत, विमा, पियुसी व इतर वैध कागदपत्रे कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी , हिंगोली यांनी जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना केले आहे.
****
No comments:
Post a Comment