19 February, 2025
बेवारस वाहनाची लिलावाद्वारे विक्री
हिंगोली (जिमाका), दि. 19 : हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर नसलेल्या परंतु पोलीस स्टेशन परिसरात पडून असलेल्या बेवारस वाहनाची उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत तपासणी केली आहे. या तपासणीत हे सर्व वाहने खूप वर्षापासून पडून असल्याने त्यांचे नंबर प्लेट, चेसेस क्रमांक व्यवस्थित व स्पष्ट नसल्याने तसेच खोडलेले असल्याने त्याचा मूळ मालक कोण आहे हे कळू शकले नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन परिसरात हे पडून असलेले दुचाकी 30 वाहने व तीन चाकी, चार चाकी 11 वाहने असे एकूण 41 वाहने आहेत.
या वाहनाबाबत आतापर्यंत कोणीही मालकी हक्क किंवा त्यासंबंधी दस्तऐवज सादर करुन मागणी केली नाही. त्यामुळे नजीकच्या काळात ही सर्व वाहने बेवारस म्हणून लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन हिंगोली (ग्रामीण) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
*****
No comments:
Post a Comment