10 March, 2025

महिला व बालकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन

हिंगोली (जिमाका), दि. 10 : महिला व बालकांच्या मदतीसाठी देण्यात आलेल्या सर्व हेल्पलाईनची माहिती ग्रामपंचायत, नगर परिषद, नगर पंचायत व पंचायत समितीस्तरावर जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने महिलांसाठी राष्ट्रीय महिला हेल्पलाईन-181, संकटात असलेल्या महिलांसाठी हेल्पलाईन-1091, राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाईन-7827170170, राज्य महिला आयोग हेल्पलाईन-155209 आणि आपत्कालीन प्रतिसाद क्रमांक-112 या हेल्पलाईन आहेत. तर बालकांसाठी 1098 ही हेल्पलाईन आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. *****

No comments:

Post a Comment