22 April, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून जिल्हा रुग्णालय यंत्रणेचा आढावा
• एसएनसीयू , एनआरसी, डीईआयसी, एड्स नियंत्रण विभाग व डायलिसिस विभागाचे केले कौतुक
हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नुकतीच जिल्हा रुग्णालयातील सर्व विभागांना भेट देऊन पाहणी केली तसेच आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नव्याने होत असलेल्या एमआरआय विभाग, कॅथ लॅब व इतर बांधकामाची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णांलयातील स्वच्छता, पाण्याची व्यवस्था तसेच इतर सोयीसुविधांची माहिती घेत महत्त्वूपर्ण सूचनाही दिल्या.
याप्रसंगी हिंगोली जिल्हा रुग्णालयाला एबीडीएममध्ये महाराष्ट्रात प्रथम व एनआरसीमध्ये महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. तसेच बालरोग विभाग, एसएनसीयू, एड्स नियंत्रण विभाग, डायलिसिस विभागांचे विशेष कौतुक केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश टेहरे, बालरोग तज्ञ डॉ. गोपाळ कदम, डॉ. नंदकुमार करवा, डॉ. पुरोहित, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. मनीष बगडिया, इत्यादी अधिकारी, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment