हिंगोली (जिमाका), दि. 15 : मुद्रांक कार्यालयाकडून साठा उपलब्ध झाला नसल्यामुळे वसमत येथील अधिकृत मुद्रांक विक्रेत्यांना 500 रुपये मुद्रांकाचा तुटवडा भासत होता. परंतु जिल्हा कोषागारात प्रधान मुद्रांक कार्यालयाकडून माहे मार्च मध्ये मुद्रांक साठा उपलब्ध झालेला आहे.
सध्या 100 रुपयाचे 1 लाख 56 हजार 943 आणि 500 रुपयाचे 2 लाख 35 हजार 880 एवढे नग संख्येत मुद्रांत जिल्हा कोषागारात आहेत. तसेच उप कोषागार अधिकारी वसमत यांना त्यांच्या मागणीनुसार मुद्रांक पुरवठा उपलब्ध करुन दिला आहे. तसेच महसूल मुद्रांक सुध्दा 3 लाख 92 हजार 200 नग उपलब्ध आहेत. सध्या कोणत्याही अभिदानाचा तुटवडा नाही, असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*******
No comments:
Post a Comment