15 April, 2025

दहावी उत्तीर्ण उमेदवारांनी सेवायोजन कार्यालयात नोंदणी करणे अनिवार्य

हिंगोली (जिमाका), दि. 15 : महाराष्ट्र शासनाने दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सेवायोजन कार्यालयामध्ये सध्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली या विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण तसेच पुढील शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या सर्व उमेदवारांनी वरील संकेतस्थळाला भेट देवून आपली नोंदणी पूर्ण करावी. नोंदणीवेळी काही अडचण निर्माण झाल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, हिंगोली यांनी केले आहे. ******

No comments:

Post a Comment