21 May, 2025

मत्स्य व्यवसायाशी निगडीत व्यक्ती व संस्थांनी एनएफडीपी पोर्टलवर नोंदणी करावी

• पात्र मच्छिमारांनी साहित्य खरेदी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत हिंगोली (जिमाका), दि. 21 : प्रधानमंत्री मत्स्य किसान समृध्दी सहयोजनेंतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व मच्छीमार व मत्स्य व्यवसायाशी निगडीत व्यक्तींची व संस्थांची एनएफडीपी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपल्या जवळच्या आपले सेवा केंद्राशी संपर्क साधून नोंदणी करावी. तसेच एनएफडीपी पोर्टलवर www.nfdp.dof.gov.in या संकेतस्थळाला वैयक्तीक भेट देऊन स्वत:हून मच्छीमार म्हणून नोंदणी करावी. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गंत मच्छिमारांसाठी मोफत अपघात गटविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, हिंगोली यांना कळविण्यात यावी. पात्र मच्छिमारांनी साहित्य खरेदी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्यातील मच्छिमारांना मासेमारीकरिता असणारी तयार मासेमारी जाळे, बिगर यांत्रिकी नौका इत्यादी साहित्य खरेदीसाठी अनुज्ञेय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र मच्छिमारांनी आपले प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, हिंगोली येथे तात्काळ सादर करावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां), मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, हिंगोली दूरध्वनी क्र. 02456-224447 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, हिंगोली यांनी केले आहे. **

No comments:

Post a Comment