21 May, 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ

हिंगोली (जिमाका), दि. 21 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली. यावेळी तहसीलदार आश्विनकुमार माने, नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ***

No comments:

Post a Comment