07 November, 2025

महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) अधिनियमांतर्गत तयार करण्यात आलेल्या प्रारुप नियमाबाबत मंगळवारपर्यंत हरकती सादर करा

हिंगोली (जिमाका), दि. 07 : महाराष्ट्र खाजगी पदयोजन एजन्सी (विनियमन) अधिनियम, 2025 या कायद्यास दिनांक 28 एप्रिल, 2025 रोजी मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत तयार करण्यात आलेले प्रारुप नियम (मराठी व इंग्रजी मसुदा) हे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक, खाजगी पदयोजन एजन्सी तसेच संबंधित भागधारक यांनी या प्रारुप नियमांबाबत आपले हरकती, सूचना किंवा अभिप्राय देऊ शकतात. यासाठी वरील संकेतस्थळावर देण्यात आलेल्या गुगल फार्म लिंकवर दि. 11 नोव्हेंबर, 2025 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत संबंधितांनी त्यांच्या हरकती, सूचना किंवा अभिप्राय नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा.सु.मरे यांनी केले आहे. **

No comments:

Post a Comment