अभियांत्रिकी
व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन योजनेसाठी आवेदनपत्र सादर करावे
हिंगोली (जिमाका), दि. 29 : अनुसूचित
जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वी नंतर नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थांच्या सहाय्याने
अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी (नीट / सीईटी / जेईई) मार्गदर्शन देण्यासाठी
सन 2026–27 या शैक्षणिक वर्षाकरिता विशेष योजना
राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील
खाजगी तसेच मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले अनुसूचित जमातीचे
विद्यार्थी मार्च 2026 मध्ये इयत्ता 10 वीच्या परीक्षेस बसलेले आहेत आणि नीट, सीईटी
किंवा जेईई परीक्षेसाठी इच्छुक आहेत, अशा विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात आवेदन पत्र
भरावे.
सदर भरलेली आवेदन पत्रे दिनांक 15 फेब्रुवारी
2026 पर्यंत संबंधित प्रकल्प कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी, जि. हिंगोली यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment