रस्ता सुरक्षा अभियान २०२६ला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते प्रारंभ
रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे काटेकोरपणे नियम पाळा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली दि. १९ (जिमाका) : दैनंदिन होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज येथे केले.
वाहन अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. यावर्षी 'रस्ता सुरक्षा अभियान २०२६' परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असून, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते चित्ररथाची फित कापून अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज करण्यात आला.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे, मोटर वाहन निरीक्षक आशिक तडवी, दिपक ढाकणे, अतुल बानापुरे, चंद्रक्रीर्ती टिपले, आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना दिल्या. दैनंदिन होणाऱ्या रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
या कार्यक्रमास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी रस्ते सुरक्षा अभियानाबाबत माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘स्कूल बस धोरण २०११ शालेय वाहतूक नियमावली व रस्ता सुखाचा या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले.
*****





No comments:
Post a Comment