19 January, 2026

वसमत येथे गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे  आयोजन



हिंगोली, दि. १९ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल कॅरिअर सेंटर हिंगोली व श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालय, वसमत यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे श्री योगानंद स्वामी कला महाविद्यालय, जवळा खंदारबन रोड, वसमत येथे  गुरुवार (दि.२२ जानेवारी) रोजी सकाळी १० आयोजित करण्यात आला आहे.

 

या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील नामांकित खासगी कंपन्या व आस्थापनांचा सहभाग राहणार असून, त्यामध्ये लार्सन अँड टुब्रो कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनी इन्स्टिट्यूट, पनवेल, क्वेस कॉर्प, पुणे, मनसा मोटर्स, हिंगोली, अन्नपूर्णा फायनान्स, नांदेड, केंब्रिज मॉन्टेसरी स्कूल, वसमत, स्काय प्लेसमेंट प्रा. लि., छत्रपती संभाजीनगर, एस.बी.आय. लाईफ इन्शुरन्स, हिंगोली, स्वतंत्र मायक्रो फायनान्स, हिंगोली, डे टू डे मार्ट, वसमत, बी.आर.सी. पेट्रोलियम, वसमत, भारतीय जीवन विमा निगम, हिंगोली, बंसल क्लासेस, हिंगोली, चैतन्या इंडिया फिनक्रेडिट प्रा. लि., हिंगोली

आदी कंपन्यांचा समावेश आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील शासनाच्या विविध महामंडळांचे स्टॉलही या रोजगार मेळाव्यात उपलब्ध राहणार आहेत.

या रोजगार मेळाव्यांतर्गत १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदवीधर अशा विविध शैक्षणिक पात्रतेनुसार सुमारे ३५० रिक्त पदे अधिसूचित करण्यात आली असून, संबंधित पदांची माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करून खाजगी क्षेत्रातील नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत.

अर्ज केलेल्या उमेदवारांनी आवश्यक मूळ कागदपत्रांसह वसमत येथे गुरुवारी सकाळी १० वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहितीसाठी ०२४५६-२२४५७४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयाचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.

*****


No comments:

Post a Comment